हवामान विभागाकडून पावसाची ‘तारीख पे तारीख’ आता ‘ही’ दिली तारीख
1 min readपुणे, दि. १८:- मोसमी पावसाच्या आगमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आता हवामान विभागाने नवीन अंदाज जाहीर केला आहे. यानुसार, आता देशासह राज्यात दि. २३ ते २९ जून यादरम्यान पाऊस सक्रीय होण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. विभागाने यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात दि. १८ ते २२ जून या काळात मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा होती.
हा कालावधी आणखी काही दिवस पुढे गेला आहे. ‘सध्या मोसमी पावसाच्या वाटचालीत कोणतीही प्रगती दिसत नाही. पण, त्याच्या वाटचालीस भारतीय द्वीपकल्प आणि समुद्री सीमावर्ती भागांत पूरक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे दि. २३ जूननंतर पाऊस सक्रिय होण्याची अपेक्षा आहे.
तर, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील मान्सूनच्या शाखा सक्रिय होऊन चांगल्या शक्यता आहे,’ असे हवामान पावसाची विभागाने म्हटले आहे.