अश्विनी कंटेनर मूव्हर्सचा आदर्श उपक्रम; शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त सेवेला मानाचा मुकूट

1 min read

पनवेल दि.११:- शासकीय विभागांमध्ये तसेच राज्य परिवहन महामंडळा सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेला वेळोवेळी गौरविले जाते. त्यांच्या कामातील ने प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सन्मान समारंभ आयोजित केले जातात. न मात्र खाजगी वाहतूक क्षेत्रात दिवस-रात्र रस्त्यावर धावणाऱ्या चालकांच्या कामाची दखल अनेकदा मर्यादित प्रमाणात घेतली जाते. या पार्श्वभूमीवर पनवेल येथील ने अश्विनी कंटेनर मूव्हर्स लिमिटेडया वाहतूक क्षेत्रातील नामांकित कंपनीने सुरक्षित, शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त सेवा देणाऱ्या चालकांचा दुचाकी वाहन भेट देऊन विशेष गौरव केला असून खाजगी उद्योगविश्वात प्रेरणादायी संदेश दिला आहे.मालवाहतूक क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे चक्र मानले जाते. या क्षेत्रातील चालकांना केवळ वाहन चालविण्याची जबाबदारी नसून माल सुरक्षितपणे ठिकाणी पोहोचविणे, वेळेचे काटेकोर पालन करणे, महामार्गावरील बदलत्या परिस्थितींना सामोरे जाणे, दीर्घकाळ जागरूक राहणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.अशा परिस्थितीत नियमांचे पालन करून सातत्याने अपघातमुक्त सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव करून कंपनीने त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान केला आहे.राज्य शासनाचा परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या माध्यमातून दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला.खाजगी क्षेत्रात कर्मचारी सन्मानाची संस्कृती वाढत असल्याचे हे उदाहरण मानले जात आहे. वाहतूक क्षेत्रात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत. सरकारी पातळीवरील मोहिमांबरोबरच खाजगी उद्योगांनीही जबाबदारी स्वीकारल्यास रस्ते सुरक्षिततेचा व्यापक परिणाम दिसू शकतो. अश्विनी कंटेनर मूव्हर्स लिमिटेडने दाखवून दिलेला हा आदर्श आता इतर वाहतूक कंपन्यांसाठीही दिशादर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अश्विनी कंटेनर मूव्हर्स लिमिटेडने हा उपक्रम केवळ औपचारिकतेपुरता न ठेवता वर्षभर सातत्याने प्रशिक्षण देण्याची संस्कृती निर्माण केली
आहे. कंपनीच्या अंतर्गत चालकांसाठी नियमित प्रशिक्षण सत्रे घेतली जातात.अनुभवी प्रशिक्षकांच्या माध्यमातून चालकांना प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली जाते. कंपनीच्या चालकांमध्ये समाधानाची भावना कंपनीने चालकांच्या कार्याचे मूल्यमापन करताना केवळ सेवा कालावधी न पाहता अपघातमुक्त कामगिरी, नियमांचे पालन, वेळेचे व्यवस्थापन, वाहनाची निगा आणि जबाबदार वर्तन या निकषांचा विचार केला. या निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांची निवड करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निवड झालेल्या चालकांना दुचाकी वाहने भेट देण्यात आली. हा पुरस्कार मिळाल्यानंतर संबंधित चालकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त झाली असून इतर कर्मचाऱ्यांमध्येही सकारात्मक प्रेरणा निर्माण झाली अशी माहिती भास्कर पवार यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!