पीक विमा भरताना सीएससी केंद्राकडून होणारी शेतकऱ्यांची लुट थांबणार

1 min read

बेल्हे दि.१३:- एक रुपयात पीक विमा योजना ही राज्य शासनाने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. मात्र पीक विमा भरतांना आपले सरकार सेवा (सीएससी) केंद्रावर शेतकऱ्याची लूट केली जात आहे. प्रत्यक्षात पीक विमा भरतांना शेतकरी हिस्सा म्हणुन फक्त १ रुपया भरावयाचा राज्य शासनाने खरीप व आहे. मात्र राज्यातील काही आपले सरकार सेवा केंद्रावर (सीएससी केंद्रावर) १५० ते २०० रुपये शेतकऱ्याकडून घेतले जात आहेत. असे नियमबाह्य पैशाची आकारणी करणाऱ्या (सीएससी) केंद्र चालकांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रार केली तरसंबंधित केंद्र चालकावर कारवाई करणार असल्याची माहिती जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी केली आहे.राज्य शासनाने सन २०२३ २४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक व आपले सरकार केंद्र (सीएससी केंद्र) यांचे मार्फत नोंदणी करता येणार आहे. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम ४० रुपये देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना आपला विमा हिस्सा रक्कम १ रुपया व्यक्तीरिक्त पैसे देण्याची गरज नाही.

डिजीटल सातबारासाठी फक्त १५ रुपये

डिजीटल सातबारा उतारा काढण्यासाठी शासनाने १५ रुपये आकारण्याचे आदेश आपले सरकार सेवा केंद्र यांना दिलेले आहेत. मात्र डिजीटल सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्याकडून सर्रास ३० ते ४० रुपये आकारले जातात. वाद नको म्हणुन शेतकरीही ३० ते ४० रुपये देवून मोकळे होतात. याचाच फायदा आपले सरकार केंद्र चालक घेत शेतकन्यासह सर्वसामान्यांची सर्रास लुट करत आहेत.

शेतकरी स्वतःही भरु शकतात विमा अर्ज

शासनाने शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली आहे. या मध्ये सहभागासाठी शेतकरी बँक, विमा कंपनी, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज दाखल करु शकते. त्याप्रमाणे स्वतःही अर्ज करु शकते. यासाठी PMFBY पोर्टलवर जावून https:// pmfby.gov.in वर शेतकरी स्वतः नोंदणी करु शकतात.

“विमा हप्ता भरण्यासाठी शेतकरी स्वतः अथवा बँक, विमा कंपनी, तालुका, जिल्हा कृषी कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र यांच्या आर्थिक मार्फत विमा हप्ता हिस्सा रक्कम १ रुपया भरुन या योजनेत सहभागी होवू शकतो. अर्ज भरण्यासाठी विमा कंपनी प्रति अर्ज ४० रुपये देत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. तरीही अधिकची रक्कम कोणी घेत असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांचेकडे तक्रार करावी.”

गणेश भोसले
जुन्नर तालुका कृषी अधिकारी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे