जुन्नर तालुक्यात लम्पी चे अनुदान रखडले
1 min readबेल्हे दि.१०:- लम्पी रोगामुळे बळी पडलेल्या जनावरांचे अनुदान कधी मिळनार असा प्रश्न जुन्नर तालुक्यातील पशुधन मालकांना पडला आहे. महाराष्ट्रात गाय बैल जनावरांवर लम्पी रोगाची साथ आली होती. त्यात शेतकर्यांची बरिच जनावरे दगावली याची दखल घेत सरकारने तीस हजार रुपयांचे जनावरा मागे अनुदान जाहिर केले. पुणे जिल्हयात पशुसंवर्धन खात्याने चांगले काम करून लसिकरन करुन योग्य उपचार करून साथ आटोक्यात आनली परंतू त्या काळात म्रुत्यु पडलेल्या जनावरांचे काहिंना अनुदान आले परंतू अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. आंबेगाव जुन्नर तालुक्यात जास्त जनावरे मृत झाली येथिल पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून अहवाल शासनाकडे पाठवला आहे. परंतू राहिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. तरी लवकरात लवकर कार्यवाही करून कंबरड मोडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी मागणी पशुधन मालक शिवाजी डुंबरे यांनी केली आहे.
“सर्व वंचित पशुधन मालक शेतकऱ्यांची आमच्याकडे नावे नाहीत जे शेतकरी पशुधन मालक अनुदानापासून वंचित आहेत त्यांनी नावे द्यावीत.प्रांत अधिकारी यांच्याशी बोलून लवकरच प्रश्न लवकर मार्गी लावू.”
अंबादास हांडे
शेतकरी संघटना नेते