देशात पहिल्यांदाच नऊ पोलिसांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा
1 min read
चेन्नई दि.७:- कोरोना काळात म्हणजेच 2020 मध्ये घडलेल्या एका प्रकरणामुळे केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या अत्याचारामुळे एका बाप-लेकाला आपला जीव गमवावा लागला होता.
त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि त्यातून समोर आलेल्या माहितीतून धक्क्यावर धक्के बसत गेले. याच प्रकरणाचा आता निकाल लागला असून देशात पहिल्यांदाच नऊ पोलिसांना थेट मृत्यूदंड सुनावण्यात आला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणाचा निकाल लावला आहे. सहा वर्ष चाललेल्या या सुनावणीतील निकालानंतर पीडित कुटुंबियांना न्याया मिळाला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने हे प्रकरण अत्यंत क्रूर आणि सत्तेच्या दुरुपयोगाचे मोठे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
