हरिद्वार येथे कुंभमेळ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीच्या कामांना गती

1 min read

हरिद्वार दि.७:- पुढील वर्षी महाराष्ट्रातील नाशिक आणि उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे कुंभमेळा संपन्न होत आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार बरोबरच उत्तराखंड सरकारनेही जोरदार तयारी चालवली आहे. दोन्ही शहरातील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही दोन्ही शहरातील विविध कामांसाठी मोठा निधी जाहीर केला आहे या निधी अंतर्गत नाशिक आणि हरिद्वार येथे कुंभमेळ्यांच्या पूर्वतयारीच्या कामांना गती मिळाली आहे. पवित्र शहर हरिद्वार पुढील कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सज्ज झाले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांनी हरिद्वारला भेट दिली. यावेळी हरिद्वार येथील प्राचीन अवधूत मंडल आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी रुपेंद्र प्रकाश जी महाराज यांची भेट घेतली. यावेळी बोलताना महामंडलेश्वर स्वामी रुपेंद्र प्रकाश जी महाराज म्हणाले,कुंभमेळा हा हिंदू धर्माच्या अनुयायांसाठी एक प्रमुख धार्मिक उत्सव आहे, ज्यामध्ये जगभरातील लाखो भाविक सहभागी होतात. हा उत्सव दर १२ वर्षांनी आळीपाळीने हरिद्वार, नाशिक, प्रयागराज (अलाहाबाद) आणि उज्जैन या चार पवित्र तीर्थ क्षेत्रांपैकी एका ठिकाणी आयोजित केला जातो. पुढील कुंभमेळा २०२७ मध्ये उत्तराखंडमधील हरिद्वार येथे होणार आहे. केंद्र शासनाने कुंभमेळासाठी निधी जाहीर केला आहे. राज्य शासनाच्या वतीने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामे हाती घेतले आहेत. तब्बल पन्नास लाख भाविक हरिद्वार येथील कुंभमेळ्यात सहभागी होतील. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केले आहे.कुंभमेळा १४ जानेवारी २०२७ रोजी पौष-पौर्णिमेला सुरू होऊन २० एप्रिल २०२७ रोजी महाशिवरात्रीला समाप्त होईल. अमृत स्नान अनुक्रमे मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीच्या निमित्ताने ६ मार्च, ८ मार्च आणि १४ एप्रिल रोजी होईल असे असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी हरिद्वारचे ज्येष्ठ पत्रकार अमित कुमार गुप्ता तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि आश्रमाचे कायदे सल्लागार के पी एस चौहान उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!