राजूरीच्या शरदचंद्र नागरी पतसंस्थेकडून ३०० कोटी ठेवींचा टप्पा पार
1 min read
राजुरी दि.३:- जुन्नर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली अग्रगण्य पतसंस्था शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्चअखेर ३०० कोटी ठेवींचा टप्पा पार केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांनी दिली.दरम्यान, या संस्थेची सभासद संख्या १८ हजार १५० असून,
भाग भांडवल १८ कोटी, सर्व निधी २२ कोटी, ठेवी ३०२ कोटी, कर्ज वाटप २४८ कोटी, गुंतवणूक ९१ कोटी, खेळते भांडवल ३७४ कोटी, एकत्रित व्यवसाय ५५० कोटी आहे. संस्थेने शरदचंद्र सहकार सकुंल राजुरी, आळेफाटा, आणे, नारायणगाव, वाशी (नवी मुंबई) निळवंडे या ठिकाणी स्वमालकीची जागा खरेदी केली आहे.
तसेच, संस्थेच्या १५ शाखा कार्यरत असून, नियोजित २ शाखा व ३ शाखांना मंजुरी घेण्याचा मानस आहे.या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र औटी, मानद सचिव दत्तात्रेय गंधंट, खजिनदार भिमाजी मालुरकर, संचालक, व्यवस्थापक जी. के. औटी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास घंगाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय अ. गाडगे आदी उपस्थित होते.
