वळसे पाटील महाविद्यालयात राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न
1 min read
बेल्हे दि.३:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात श्री पांडुरंग स्पोर्ट क्लब यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यभरातील विविध शाळांमधील १२ संघांनी (मुले, मुली) या स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
एक दिवस चाललेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी चुरशीचे सामने खेळत प्रेक्षकांचे मन जिंकले.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग पवार, भारतीय पुरुष संघ प्रशिक्षक शिरीन गोडबोले, आंतरराष्ट्रीय पंच किरण वाघ, राष्ट्रीय खेळाडू नरेश अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार,
तबाजी शिंदे संचालक विघ्नहर सहकारीसाखर कारखाना, अनिल पटाडे चेअरमन वि. का. से. सोसायटी बोरी बु., सरपंच किशोर घोडे, संदेश डोके, कैलास जाधव यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे,
प्राध्यापकवर्ग तसेच क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. स्पर्धेदरम्यान शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट पंचायन व्यवस्था व खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा याबद्दल सर्व संघांनी समाधान व्यक्त केले.
अंतिम सामन्यात मुले- नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन इंदापूर आणि दिलीप वळसे पाटील महाविद्यालय निमगाव सावा व मुली-श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा विद्यालय चिंचवड आणि श्री शिवाजी विद्यालय वरकुटे बु. संघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. वेगवान चढाया, अचूक बचाव आणि रणनीतीपूर्ण खेळ यामुळे सामना रंगतदार ठरला. विजेत्या संघाला
मुले – *प्रथम क्रमांक* -नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन इंदापूर *द्वितीय क्रमांक*- दिलीप वळसे पाटील महाविद्यालय निमगाव सावा *तृतीय क्रमांक*- श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा विद्यालय चिंचवड *चतुर्थ क्रमांक*- सि.टी. बोरा कॉलेज शिरूर
मुली- *प्रथम क्रमांक*- श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा विद्यालय चिंचवड *द्वितीय क्रमांक*- श्री शिवाजी विद्यालय वरकुटे बु *तृतीय क्रमांक*- माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी *चतुर्थ क्रमांक*- दिलीप वळसे पाटील महाविद्यालय निमगाव सावा यांना अनुक्रमे रुपये १११११, ९९९९, ७७७७, ५५५५ रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र व पदके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा संचालक तानाजी फुलमाळी, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना आणि नेतृत्वगुणांचा विकास होण्यास मदत झाल्याची भावना निर्माण झाल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी सांगितले.
या क्रीडा स्पर्धांसाठी पंचायत समितीचे सदस्य संभाजी चव्हाण, स्वामी समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष विजय गाडगे,परेश घोडे, नजीर चौगुले, परशुराम लगड, दत्ता मुंजाळ,दत्तात्रय घोडे, प्रा. शिवदत्त जोरी, प्रा. सुनील जायभाये, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे आजी-माजी अध्यक्ष,
सदस्य यांनी सदिच्छा भेटी दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक करून भविष्यात अशा स्पर्धा अधिक प्रमाणात आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे महाविद्यालयाचे कौतुक अध्यक्ष संदिपान पवार यांनी केले.
