नळवणे येथे श्री कुलस्वामी खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा यंदा भव्य दिव्य :- अध्यक्ष किसन शिंदे
1 min read
आणे दि.२:- चैत्र पौर्णिमे निमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत, नळवणे गावचे ग्रामदैवत श्रद्धास्थान श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान नळवणे (ता.जुन्नर) येथील यात्रा उत्सव यंदा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होत आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष किसन शिंदे यांनी दिली.गुरुवार दि.२ ते शनिवार दि.४ या कालावधीत यात्रा संपन्न होणार आहे.
पहिल्या दिवशी गुरुवार दि.२ रोजी पहाटे ४ ते ५ श्री स मंगलस्नान व अभिषेक, ५ ते ७ हनुमान जन्मोत्सव, त्यानंतर ८ ते ११ श्री ची भव्य मिरवणूक, मांडव डहाळे, देवदर्शन व खोबरे भंडाऱ्यांची उधळण होणार आहे. तसेच सायंकाळी ७ रात्री ११ श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक व शोभेचे दारूकाम होईल. रात्री ११ नंतर स्वप्नसुंदरी लावणी कार्यक्रम संपन्न झाला.
तर शुक्रवार दि.३ रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बैलगाड्यांच्या भव्य शर्यती असतील यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ४१ हजार, द्वितीय क्रमांक ३१ हजार, तृतीय क्रमांक २१ हजार तर चतुर्थ क्रमांक ११ हजार रुपयांचे असणार आहे.
तर तिसऱ्या दिवशी शनिवार दि. ४ रोजी दुपारी साडेतीन ते सहा या वेळेत जंगी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.यंदा तीन दिवस श्रद्धापूर्वक, भव्य दिव्य स्वरूपात यात्रा संपन्न होत असून महाराष्ट्र मधून असंख्य भाविक श्री कुलस्वामीचा कुलाचार करण्यासाठी व श्री च्या दर्शनासाठी येणार असून
त्यानिमित्ताने देवस्थानने भाविकांसाठी पिण्याची पाण्याची सोय, वाहने पार्किंग व्यवस्था, दर्शन रांग, सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगी सुरक्षा व्यवस्था व आळेफाटा पोलीस स्टेशन ने देखील यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला आहे. या निमित्ताने बैलगाडा शर्यती,
मनोरंजनाचा कार्यक्रम,कुस्त्यांचा आखाडा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. तरी सर्व भाविकानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन नळवणे देवस्थानचे अध्यक्ष किसन शिंदे, यात्रा कमिटी अध्यक्ष जालिंदर देशमुख व ग्रामस्थांनी केली आहे.
