बहुजन विकास विचार मंच च्या वतीने प्रवाशांसाठी पाणपोईची सोय
1 min read
आणे दि.३:- आणे (ता.जुन्नर) येथे उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उन्हाळ्यात प्रवाशांना थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने बहुजन विकास विचार मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत पाणपोईची सोय करण्यात आली. गुरुवारी (दि.२) या पाणपोईचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य शांताराम दाते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर आहेर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, वैभव आहेर, पांडुरंग गाडेकर, प्रदीप आहेर, अण्णा खैरे, संतोष आहेर,राजू आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. या संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी येथील बस स्थानकावर पाणपोईची सोय करण्यात येते.
असे संस्थेचे संस्थापक अरविंद पंडित यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष अतुल गोफणे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.पठारावरील आणे हे मोठे गाव असून परिसरातील खेडेगाव तसेच वाड्या वस्त्यांसाठी महत्वाची बाजारपेठ असल्याने नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते.
प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने गावच्या वतीने प्रशांत दाते, देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी बहुजन विकास विचार मंचचे आभार मानले.
