जिओ च्या नेटवर्क सेवेमुळे गुंजाळवाडी त्रस्त

1 min read

आणे दि.३:- जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी या गावामध्ये फक्त जिओ या एकच मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीचा टॉवर असून एक ते दीड महिन्यापासून जिओ च्या सेवेमुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. जिओ कंपनीचे गावामध्ये एकमेव टॉवर असून यावर सर्व ग्राहक अवलंबून असून गावचे नेटवर्क ठप्प झाले आहे. कंपन्यांच्या रिचार्ज चे दर वाढवल्यामुळे आधीच ग्राहक वर्ग वैतागलेला असताना त्यात भर म्हणूनच की काय गुंजाळवाडी गावामध्ये जिओ ची नेटवर्क सेवा बऱ्याच वेळा बंद असते. या टॉवरच्या बंदचे कारण अद्याप ग्रामस्थांना समजले नाही. याचा मनस्ताप जिओ च्या ग्राहकांना सोसावा लागत आहे. यामुळे बीएसएनएल या कंपनीने शक्य झाल्यास गावात गावामध्ये टॉवर उभारावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. तर हे टॉवर तात्काळ दुरुस्त करून करावे अशी मागणी सरपंच नयना गुंजाळ, किसन बोरचटे, माजी उपसरपंच सिताराम गुंजाळ, बाळू बोरचटे, मेजर गोविंद गुंजाळ यांनी केली असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ——
प्रतिक्रिया

“टॉवर दुरुस्तीचे काम चालू आहे. दोन दिवसांत सेवा पूर्ववत चालू होईल.”

मच्छिंद्र शेटे, जियो टॉवर इंजिनिअर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!