श्रीराम विद्यालयाचे ६ विद्यार्थी आर. टी. एस पात्र
1 min read
मंचर दि.३०:- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत घेण्यात आलेल्या रयत प्रज्ञा शोध परीक्षेत श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकीचे ६ विद्यार्थी लेखी परीक्षेत पात्र ठरले असल्याची माहिती मुख्याध्यापक डी. डी. फापाळे यांनी दिली.
एकूण २९ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. संस्कार किरण लायगुडे, ईक्षिता विकास पोखरकर, समर्थराजे विजय बाणखेले, आरुष राजेश जैन, समर्थ प्रकाश आवटे, आर्यन गणेश लोखंडे या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी संस्थेच्या पुणे कार्यालयात बोलविण्यात आले असून,
मुलाखतीनंतर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिष्यवृत्ती त्यांना मिळणार आहे. आर. टी. एस. विभागप्रमुख निता आवटे यांच्यसह विद्यालयातील सर्वच शिक्षकांचे यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संपूर्ण रयत शिक्षण संस्थेतून २०९ विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
