निमगाव सावात भव्य जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धचे आयोजन

1 min read

निमगाव सावा दि.३०:- श्री ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग स्पोर्ट क्लब निमगाव सावा (ता. जुन्नर, पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हा स्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आल्याचे क्रीडाशिक्षक प्रा. फुलमाळी यांनी सांगितले.मंगळवार दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, सिरीन गोडबोले (प्रशिक्षक पुरुष संघ भारत), संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार,सचिव परेश घोडे, प्राचार्य प्रल्हाद शिंदे, आंतरराष्ट्रीय पंच किरण वाघ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जगदीश नानजकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे.सदर स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील एकूण सोळा नामांकित खो-खो संघ (मुले व मुली) सहभागी होत आहे.या स्पर्धेला प्रथम क्रमांक ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांक ९ हजार ९९९ रुपये, तृतीय क्रमांक ७ हजार ७७७ रुपये, चतुर्थ क्रमांक ५ हजार ५५५ रुपये व सन्मानचिन्ह, मेडल अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी सर्व क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला उपस्थित राहून क्रीडा स्पर्धेचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!