एक्साईड दिक्षा फाउंडेशन, दिल्ली तर्फे समर्थ आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप’ प्रदान

1 min read

बेल्हे दि.३०:- एक्साइड इंडस्ट्रिस लिमिटेड यांच्या सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत ‘ एक्साईड दिक्षा स्कॉलरशिप’ योजनेंतर्गत समर्थ आय.टी.आय, बेल्हे येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.या उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिशियन व फिटर या ट्रेडमधील एकूण १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्याला रु.४५,००० इतकी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यास तसेच कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.इलेक्ट्रिशियन ट्रेडमधून साहिल शिवाजी पावडे,साहिल सुरेश पावडे,आयुष अमित जाधव,गणेश बाबा आदक,सोहम अशोक शिंगाडे,विनोद तुकाराम जाधव,साहिल सूर्यकांत घोलप व कुणाल सचिन गाडगे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.तसेच फिटर ट्रेडमधून आदित्य कचरू राजापूरे,प्रदीप मच्छिंद्र मथे,शुभम भारत सरोदे आणि जशेश खंडू शिंदे यांचा समावेशआहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी तसेच सहकार्य करणारे शिक्षक नवाब शेख आणि निकेश औटी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!