दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेट आता एकाचवेळी दिले जाणार; बोर्डाचा मोठा निर्णय

1 min read

मुंबई दि.३०:- राज्यातील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लाखो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रमाणे मार्कशीट आणि सर्टिफिकेटसाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नसून मार्कशीट आणि सर्टिफेकेट एकाच वेळी मिळणार आहे. तसेच बोर्डाने मार्कशीट आणि सर्टिफिकेटबाबत ही मोठा निर्णय घेतला असून आता दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याचा फोटो आणि एक क्युआर कोड असणार आहे. यामुळे विद्यार्थ्याची माहिती सहज मिळणार असून बोगस मार्कशीट त्वरित ओळखता येणार आहे.नुकताच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असून आता निकालाची प्रतिक्षा लाखो विद्यार्थ्यांना लागली आहे. एकीकडे निकाल लागला तरी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेटसाठी प्रतीक्षा करावी लागते. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना निकालाची प्रत दिली जायची. त्यानंतर सुमारने सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जायचे. पण आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा संपणार असून याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफेकेट एकाच वेळी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर यावेळी दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेटमध्ये मोठे बदल करण्याचाही निर्णय बोर्डाने घेतला आहे.दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर आता विद्यार्थ्याचा फोटो आणि एक क्युआर कोड असणार आहे. हा निर्णय बोगस मार्कशीट आणि सर्टिफिकेट त्वरित ओळखता यावा यासह क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती सहज मिळावी यासाठी घेण्यात आला आहे. दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल घोषित करण्याच्या तयारीत आहे.मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला होता. यंदा मात्र तो लवकर जाहीर करण्याची तयारी बोर्ड करत आहे. याप्रमाणे दहावीचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. तर बोगस मार्कशीट शोधण्यासह निकालाची सत्यता पडताळण्यासाठी बोर्डाने क्यूआर कोडचा वापर केला आहे. यामुळे आता काही सेकंदात निकालाची सत्यता पडताळता येणार आहे. नव्या मार्कशीटवर आधारकार्डानुसार विद्यार्थ्याचे नाव, फोटो आणि क्यूआर कोड असणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!