नमो शेतकरी महासन्मान निधी योजना निधी वितरण; बळीराजाच्या समृद्धीचा नवा अध्याय

1 min read

मुंबई दि.२६:- राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमी करणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत बुधवार दि.२५ रोजी महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते राज्यातील तब्बल ८९,७५,२९८ शेतकऱ्यांना ₹ १७,९८,७८,२४,००० इतक्या रकमेचा ८ वा हप्ता वितरित करण्यात आला.ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि शेती विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, बळीराजाला थेट आर्थिक मदत मिळवून देणारी प्रभावी योजना म्हणून ओळखली जाते. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!