अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणार्‍या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई

1 min read

अहिल्यानगर दि.२६:- कामरगाव परिसरात एका मिसळच्या पार्किंगमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणार्‍या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 2 कोटी 1 लाख 9 हजार 628 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. तेथे तीन एचपी गॅस टँकरमधून गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळी चौघांना ताब्यात घेतले. सचिन आबा बोधले (वय 31, रा. दहिवडी, ता. तुळजापुर, जि. धाराशीव), माणिक बालाजी गुट्टे (वय 32, रा. दैठणे, ता. परळी, जि. बीड), उल्हास जीवन कवडे (वय 32, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशीव) आणि अमृत बाळासाहेब ठोकळ (वय 33, रा. कामरगाव) अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी 30 लाख 48 हजार रूपये किमतीचा 57.200 टन गॅससह तीन एचपी गॅस टँकर, भारत गॅसचे भरलेले व रिकामे सिलेंडर, एक टेम्पो, तसेच गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 2 कोटी 1 लाख 9 हजार 628 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!