गॅस टंचाई मुळे ग्रामीण भागात पेटू लागल्या मातीच्या चुली
1 min read
बेल्हे दि.१४ :- गॅसचे दर सतत वाढत असल्याने तसेच अमेरिका, इराण, इस्रायल युद्धामुळे पारंपरिक चुलीची मागणी ग्रामीण भागात वाढली आहे. तसेच गॅसची बचत करण्यासाठी व चविष्ट जेवणासाठी चुलीवरच्या स्वयंपाकाला पसंती मिळत आहे.
आजच्या धावत्या युगात काळानुसार स्वयंपाक बनवण्याठी अनेक आत्याधुनिक उपकरणे आले असताणा देखील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रूक येथील राजेंद्र ज्ञानेश्वर जाधव यांनी गेल्या चाळीस वर्षापासुन आपल्या घरी मातीच्या चुली बनवण्याचे काम करत असून गेल्या पाच सहा दिवसांपासून चुलींची मागणी वाढण्याचे जाधव यांनी सांगितले.
ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी स्वयंपाक बनवण्याठी सध्या मातीच्या चुलीचा वापर वाढला आहे. या मातीच्या चुली बनवण्याचे काम गेल्या चाळीस वर्षापासुन बोरी बुद्रूक (ता.जुन्नर) येथील राजेंद्र ज्ञानेश्वर जाधव हे करत आहे. राजेंद्र जाधव यांचा हा व्यवसाय त्यांचे वडील ज्ञानेश्वर
रामभाऊ जाधव हे साठ ते सत्तर वर्षापासुन काम करत आहे. त्यांच्या वडीलांची परंपरा राजेंद्र जाधव यांणी सुमारे चाळीस वर्षापासुन कायम ठेवली आहे. आजही ते मातीच्या चुली स्वत: बनवुन गावोगावी विकत आहे.
प्रतिक्रिया
“दीडशे रुपये ते दोनशे रुपये मातीच्या चुलीला सध्या दर मिळत आहे. सध्या चुलीला मागणी वाढली आहे. कामगारांची कमतरता आम्हाला सध्या जाणवत आहे. तसेच चुली बनवण्यासाठी मातीचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढ होण्याची शक्यता आहे.
राजेंद्र जाधव
बोरी
