श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त धावले ४०० बैलगाडे

1 min read

बेल्हे दि.१४:- पारगाव तर्फे आळे येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रविवार दि. ८ या दिवशी हभप विशाल महाराज खोले यांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर महाप्रसाद व संध्याकाळी शेरण्या व काठी पालखीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच दि.१० व ११ या दिवशी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ४०० गाडा मालकांनी यात्रेमध्ये सहभाग घेतला प्रथम नंबरसाठी ८१०००, द्वितीय नंबरसाठी ६५०००, तृतीय नंबरसाठी ५५०००, चतुर्थ नंबरसाठी ४५००० हजार रूपये बक्षिस ठेवण्यात आले होते. पहिल्या दिवशी प्रथम क्रमांकात फळीफोडसाठी मयुर हरीभाऊ डुकरे / दोस्ती गृप बैलगाडा तर दुस-या दिवशी फळीफोडसाठी प्रथम क्रमांकात प्रितेश बाळासाहेब पवार / गणपत पाराजी डुकरे हे मानकरी ठरले तसेच एक नंबर फायनलसाठी पहिल्या दिवशी नवनाथ गंगाराम डुकरे / जयवंत यशवंत घेवडे व गबाजीशेट पानसरे /पाटीलबुवा बाळाजी दाभाडे तर दुसऱ्या दिवशी फायनलचे मानकरी बाळासाहेब महादेव गुंजाळ / दत्तूशेठ बांगर व विठ्ठल महादू शेटे / रोहित लक्ष्मण गागरे मानकरी ठरले. आपल्या तुफान वेगाच्या जोरावर संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यात गाजलेला मयूर डुकरे (मच्या ग्रुप) बैलगाडा संघटनेचा हुकमी एक्का शिवनेरी केसरी मच्या या बैलाचा सन्मान हिंदकेसरी निशान बहाद्दर पोपट पानसरे यांच्यावतीने करण्यात आला. बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या दिवशी वसंत नांदवळकर लोकनाट्य तमाशा मंडळ व दुसऱ्या दिवशी अश्विनी शिवानी बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला. यात्रेमध्ये प्रमुख आकर्षण पाळणे ठरले या पाळण्यामध्ये बसण्यासाठी परिसरातील लोकांनी चांगली गर्दी केली होती. यात्रा काळामध्ये सर्व देणगीदार, अन्नदाते तसेच यात्रेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यात्रा कमिटी अध्यक्ष शेखर शिर्के व उपाध्यक्ष रोहिदास तट्टू यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!