आष्टी तालुक्यातील डोईठाण केंद्रावर खळबळ; दहावीच्या परीक्षेवेळी हॉलमध्ये घुसून विद्यार्थिनीला बेदम मारहाण

1 min read

आष्टी दि.१४:- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील परीक्षा केंद्रावर शुक्रवारी दि.१३ सकाळी दहावीच्या विद्यार्थिनीला एका तरुणाने थेट वर्गात घुसून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. सकाळी पावणे अकराच्या सुमारास जेव्हा सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी आपापल्या जागी बसले होते, तेव्हा देसूर येथील एका तरुणाने अचानक हॉलमध्ये प्रवेश करून बीडसांगवी येथील एका विद्यार्थिनीवर हल्ला केला आणि तिथून पळ काढला. या अनपेक्षित प्रकारामुळे पीडित विद्यार्थिनी प्रचंड भयभीत झाली असून तिने रडत केंद्र संचालकांना सर्व हकीकत सांगितली. विशेष म्हणजे केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही हा तरुण थेट हॉलपर्यंत पोहोचलाच कसा, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शाळा प्रशासनाने या घटनेची माहिती तातडीने पालकांना दिली असून पोलीस आता या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!