सोशल मीडियाचा अतिवापर शालेय विद्यार्थ्यांसाठी घातक:- पी.आय लहू थाटे
1 min read
खामुंडी दि.८:- खामुंडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या संकल्पने तून तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून दि.६ रोजी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत मार्गदर्शन करताना “सोशल मीडियाचा अति वापर हा शालेय विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतो,” असे सांगितले.
डॉ. मनीषा गाडेकर (स्त्री रोग तज्ञ),डॉ.अर्चना तितर (त्वचा रोग तज्ञ), डॉ.विशाल घुले (एम. बी. बी एस) व डॉ.सूरज शिरसाठ यांच्या सौजन्याने आयोजित या आरोग्य शिबिरात शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता. यावेळी काही दिवसांपूर्वी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व सोशल मीडियाचा मर्यादित वापर करण्याचा सल्ला दिला. विशेषतः इन्स्टाग्राम सारख्या माध्यमांचा अति वापर टाळावा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि चुकीच्या मार्गाला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप गंभीर, रामभाऊ भोर, मंगेश शिंगोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य जितेंद्र रोकडे, कैलास बोडके, नितेश रोकडे, गणेश सोनवणे, नवनाथ शिंगोटे, सुहास नलावडे तसेच शिक्षक सविता हिरे, दीपाली डुंबरे,
शोभा खर्गे, सुखदेव पथवे, संजय आहेर, सुवर्णा नांगरे, सुनीता वर्पे आदी उपस्थित होते.आजच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना झालेल्या मार्गदर्शनाने मोबाईल विरहित शाळा संकल्पनेला चालना मिळाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.
