जुन्नर तालुक्याचा दौरा आटपून जाताना झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांच्या गाडीला अपघात

1 min read

मंचर दि.६:- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे काल जुन्नर तालुका दौरा आटपून जात असताना त्यांच्या वाहनाला पुणे- नाशिक महामार्गावर एकलहरे गावचे हद्दीत बुधवारी (दि.५) किरकोळ अपघात झाला. यात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसून वाहनाचे नुकसान झाले आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नर येथे केंद्रीय सचिव दौऱ्यावर येणार होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे पुणे इथून जुन्नरच्या दिशेने इनोव्हा गाडीतून सकाळी निघाले. त्यांच्या समवेत त्यांचा सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार संजीव पाटील व चालक दीपक दत्तात्रय शिंदे हे होते.

पुणे- नाशिक महामार्गावर एकलहरे गावचे हद्दीत बाजूने ट्रक (एमपी १३ जीबी ५२२५) जात असताना चालक विजय रमेश सोलंकी याने ट्रक इनोव्हाच्या बाजूला वळवला. त्यामुळे इनोवा चालक दीपक शिंदे याने वाहन डाव्या बाजूला जाऊन डिव्हायडरला धडकून अपघात झाला. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे.

इनोव्हाचे डाव्या बाजूचे दोन्ही टायर फुटले असून बंपरचे नुकसान झाले आहे. आतील तिघांना कुठलीही दुखापत झाली नाही. मंचर पोलिसांना माहिती समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला गेला आहे. दरम्यान आयुष्य प्रसाद हे दुसऱ्या वाहनातून जुन्नर येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे