नारायणगाव उपबाजारात प्रचंड धुळीमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन:-प्रमोद खांडगे पाटील

1 min read

नारायणगाव दि.५:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जुन्नर बाजार समितीचे सभापती संजयजी काळे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गणपीर डोंगराच्या पायथ्याशी धना मेथीचे
मार्केट सुरू केले आहे. आपणांस स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी बांधव, आडतदार, व्यापारी, मापाडी चांगल्या प्रकारचे सहकार्य करत आहेत.

मार्केटला काँग्रेटीकरण कायमस्वरूपी करण्यात यावी व मार्केट स्थिर ठेवण्यात यावे. धना-मेथीसाठी कायमस्वरूपी डोम (शेड) उभारण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांचे भाजीपाला भिजणार नाही व ऊन वाऱ्यापासून संरक्षण होईल यासाठी डोम अत्यंत आवश्यक आहे.धना मेथीचे मार्केट प्रत्येक प्रत्येक आडत वर दररोज नंबर वाईट लिलाव चालू होत असतात

परंतु नंबर वाररीनुसार लिलाव झाल्यामुळे अगदी उत्तम पद्धतीने व्यापार होत आहे त्याचे शेतकऱ्यांना व शेतकरी संघटनेला समाधान आहे परंतु नंबर वाईज निलाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री बारा एक वाजता निलाव करणे, धना मेथी मोजून देणे, व आडतदारांकडून पट्टी घेण्यापर्यंत प्रचंड वेळ जातो.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार व आडतदारांबरोबर विचार विनिमय करून एकाच वेळेला सर्व आडतरांनी निलाव चालू केले तर, सोईस्कर होणार नाही का? याचा देखील आपण सर्वांबरोबर मीटिंग घेऊन आढावा घ्यावा व योग्य तो निर्णय घ्यावा? धना मेथीच्या मार्केटमध्ये प्रचंड धुळी असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.त्यामुळे शेतकरी,व्यापारी इतर सर्वांना धुळीचा त्रास होत आहे.त्यामुळे सतत मार्केटमध्ये करणाऱ्यांना त्रास होत आहे. मार्केटमध्ये काम करणारे बांधव आजारी देखील पडत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये दिवसांतून किमान दोन-तीन वेळा पाणी मारणे अत्यंत गरजेचे आहे.प्रमुख मागण्या
१)प्रामुख्याने धना मेथीच्या मार्केटमध्ये कायमस्वरूपी डोम (शेड)काॅग्रेटीकरण करणे गरजेचे आहे ही प्रमुख मागणी
आहे. २)सदर ठिकाणी शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.३)एक्स्प्रेस हायवे असल्याने शेतकऱ्यांना धना मेथी आणण्यासाठी प्रचंड अडचणी निर्माण होत आहे. एक्स्प्रेस हायवेवर मार्केट समोर गतीरोधक,व रस्त्या क्राॅस करण्यासाठी योग्य त्या व्यवस्था उपलब्ध करून देणे.वरील विषयांचा गांभिर्याने विचार करून तात्काळ व्यवस्था करुन द्या. वरील सर्व गोष्टींचा विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटना, आडतदार,व्यापारी‌, सर्व काम करणारे कर्मचारी, शेतकरी बांधवांची मिटींग लावावी.

निवेदन नारायणगाव उप बाजार समितीचे सचिव शरद धोंगडे यांनी स्वीकारले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील,युवा अध्यक्ष विक्रम सोलाट पाटील,ग्राहक कल्याण समिती तालुकाध्यक्ष के डी सरोदे, आडतदार यश मेहेर व शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!