प्रवाशांसाठी बेल्हे बसस्थानवर पाणपोई सुरू

1 min read

बेल्हे दि.५:- तुकाराम बिजेचा मुहुर्त साधुन बेल्हे (ता.जुन्नर) एस.टी बसस्थानक मित्रमंडळा तर्फे पानपोई सुरू करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन ह.भ.प बाळशिराम महाराज बांगर व पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट तसेच वृध्दमाता पिता सेवक किसन देशमुख यांच्या हस्ते करन्यात आले. याप्रसंगी ह.भप.बाळशीराम महाराज यांनी पानपोई चे महत्व सांगितले हा उपक्रम चालू करून मंडळाला तहानलेल्यांचे आशिर्वाद मिळतील अशी भावना व्यक्त केली. तालुक्यात मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढला असून प्रवाशांना थंड पाण्याची सोय या माध्यमातून झाली आहे. याप्रसंगी शिवाजी डुंबरे, पांडू संगमनेरकर, रमेश पिंगट, गोरख पिंगट, संजय पिंगट, संतोष पिंगट, चंद्रकात घोडके, जालिंदर गायकवाड, दत्तोबा गुंजाळ, तात्या लामखडे, अंबादास आरोटे, वामन नेहरकर, इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!