जीएमआरटी खोडद येथील राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
1 min read
ओतूर दि.५:-जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण असलेल्या खोडद येथील जीएमआरटीने विज्ञान दिनानिमीत्त आयोजित केलेल्या शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ व रविवार दिनांक १ मार्च २०२६ या दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनात १३० शाळा, २७० महाविद्यालये, व २२ संशोधन संस्थांनी सहभाग घेतला होता.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये शरदचंद्र पवार इंजिनिअरिंग कॉलेजच्या एआय अँड एमएल विभागामधील अहिरे ओम, जुंदरे पृथ्वीराज, शेवाळे चेतन, सुंकी सोहम या विद्यार्थ्यांनी “टिच कनेक्ट” या प्रकल्पासाठी तृतीय क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे महाविद्यालयातील एआय अँन्ड एमएल इंजिनिअरिंग शाखेची ही पहिली बॅच असून
त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविणे ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळाले असून इतर विद्यार्थ्यांनाही संशोधन व नवकल्पनां साठी प्रेरणा मिळाली आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना प्राध्यापक पल्लवी घोलप व प्राध्यापक सुमित लोहटे यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाच्या या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, मानद सचिव वैभव तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी.यु खरात तसेच संगणक विभागप्रमुख डॉ सुनील खताळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्राध्यापक नीता बानखेले, एआय अँन्ड एमएल विभागप्रमुख डॉ पूजा घोलप,
मेकॅनिकल विभागप्रमुख प्राध्यापक सचिन जाधव, प्रथम वर्ष समन्वयक प्राध्यापक सिद्धेश पानसरे, कार्यालय अधीक्षक विशाल बेनके तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
