जिल्हा परिषद शाळा पारगाव तर्फे आळे येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
1 min read
पारगाव दि.५:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल स्कूल पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये ऑपरेशन सिन्दुर, कव्वाली, बिबट्याची समस्या, संभाजी महाराज जीवनपट, मराठी शाळा, गणपती बाप्पा, राधा कृष्ण, भक्त प्रल्हाद, नरसिंह,
खंडोबा यांस अनेक गाणे, नृत्य, जीवनपट, नाटक सादर केले. तसेच बाल चिमुकल्यांनी धार्मिक, पारंपारिक, देश भक्तीपर व आधुनिक प्रकारची नृत्य सादर केले. उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.पंचायत समितीचे सदस्य संभाजी चव्हाण, गावच्या सरपंच रेश्मा बोटकर,
उपसरपंच रामचंद्र डुकरे शाळा समितीचे अध्यक्ष रघुनाथ तट्टू यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेश दुरगुडे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, प्राथमिक शिक्षक पतसंस्था सभापती सचिन मुळे,
महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवले सर, गावचे माजी सरपंच देवराम तट्टू, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हनुमंत भोर, सचिन डुकरे, रामदास तटटू यांसह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गावातील व परिसरातील शेकडो पालक उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक लहू गोफने व सर्व शिक्षक व व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. 
