बेल्हे ग्रामपंचायतीने सोडवला विद्यार्थांचा पाण्याचा प्रश्न

1 min read

बेल्हे दि.२७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर बेल्हे (ता.जुन्नर) शाळेत आदर्श ग्रामपंचायत बेल्हे यांच्या माध्यमातून मुलांच्या पाणी पिण्याची सोय होण्यासाठी बोअरवेल घेण्यात आला. विद्यार्थ्यांना पिण्याच्या व वापरायच्या पाण्याची चांगली सोय झाली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरामध्ये बाग फुलवली आहे. विविध प्रकारची झाडे विद्यार्थ्यांनी लावली आहेत. त्या बागेला ही पाण्याची चांगली सोय झाली आहे. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. त्यामुळे मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा या बोअरवेल मुळे ग्रामपंचायतीने सोडवला आहे. गुरुवार दि.२६ रोजी जलपूजन करण्यात आले. या परिसरात बहुदा बोअरवेल ला पाणी लागत नाही परंतु विद्यार्थ्यांच्या कृपाशीर्वादाने बोअरवेल ला चांगली पाणी लागले आहे. शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी बेल्हे ग्रामपंचायत नेहमीच अग्रस्थानी राहिलेली आहे. सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य आपले शाळेच्या वतीने मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी यांनी आभार मानले. प्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट, सरपंच मनिषा डावखर, पल्लवी भंडारी, कमल घोडे, अनन्या तपासे, समीर गायकवाड, अनिता पिंगट, कैलास आरोटे, नवनाथ शिरतर, पापाभाई कुरेशी, अल्पेश सोनवणे, रितेश देशमुख, गणेश पिंगट, मंगेश तपासे, स्वप्निल खोल्लम, शरद खोल्लम, देविदास पिंगट, प्रतिक वाकचौरे अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांची उपस्थिती व सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुटे व सहशिक्षिका सुरेखा कुटे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!