पुणे येथिल BSI मिशन 25 जुन्नर, आंबेगाव, खेड, तालुका संयुक्त बैठक अवसरी खुर्द येथे संपन्न

1 min read

पुणे दि.२७:- दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा नोंदनीकृत संस्थापक बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रिय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिश रावलिया, रिपोट्रिंग ट्रस्टी चेअरमन एडवोकेट सुभाष जंजाळे, ट्रस्टी राष्ट्रिय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदय डॉ भीमराव यशवंत आंबेडकर जिल्हा पुणे पाश्चिम सविनय जयभीम.21 फेबुवारी 2026 रोजी जिल्हा पुणे पश्चिम अंतर्गत तालुका खेड, आंबेगाव, जुन्नर, विभागातील बीएसआय मशिन 25 साठी महत्वपुर्ण मिटिंग आयुष्यमान महेश वाघमारे अध्यक्ष तालुका आंबेगाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आले,सदर बैठकीचे उदघाटन जिल्हाध्यक्ष प्रकाशजी ओव्हाळ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी तिन्ही तालुक्यातील कार्यकारणी उपस्थित होते. सदर बैठकीस पुणे.जिल्हा अध्यक्ष आयु प्रकाशजी ओव्हाळ, सरचिटणीस आयु दलितानंद थोरात, कोषाध्यक्ष रविंद्र अभंग यांनी प्रस्ताविक केले. आयुष्यमान पि.के. पवार संस्कार उपाध्यक्ष जि पुणे पश्चिम, प्रचार आणि पर्यटन उपाध्यक्ष फुलवारा शिंदे, व संरक्षण सचिव आयुष्यमान जयसिंग शिंदे यांनी विषयवार मार्गदर्शन केले. या बैठकीस खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील नितिन साळवे, यशवंत गायकवाड, विजय वाघमारे, राकेश डोळस, खंडू माळवे,वैभव भवार, तालुक्यातील सर्व कार्यकरणी उपस्थित होते. बीएसआय मिशन 25 बाबत जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, यांनी सविस्तरपणे मनोगतातून मार्गदर्शन करण्यात आले.
आंबेगाव तालुका सरचिटणीस सचिन ढोणे व त्याचे स्थानिक पदाधिकारी यांचे उत्तम सहकार्य लाभले बैठकीचे सुत्रसंचालन जुन्नर तालुका सरचिटणीस यशवंत गायकवाड यांनी केले तर खेड तालुका अध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. या बैठकीस उतम प्रतिसाद मिळाला असून सर्वांनी एकत्रितपणे काम करून बीएसआय मिशन 25 यशस्वी करण्याचे निश्चित केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!