सह्याद्री आभियांत्रिकीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात सुरु

1 min read

राजुरी दि.२६:- राजुरी (जुन्नर) येथील सहयाद्री व्हॅली आभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त “सृजन” २०२६ अंतर्गत सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक खजिनदार सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेहसंमेलनातर्गत इनडोअर व आउटडोअर विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले त्यामध्ये हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट आणि इ स्पोर्ट, बुद्धिबळ, कॅरम म्युझिकल चेअर इत्यादी क्रीडा प्रकारात उत्फूर्त सहभाग नोंदवला. त्याचबरोबर पोस्टर प्रेसेंटेशन, डिजिटल पोस्टर कॉम्पिटिशन, मेहंदी, रंगोली आणि विविध डेज सेलिब्रेट करण्यात आले. त्यामध्ये मिस मॅच डे, रोज डे चॉकलेट डे, रेट्रो डे, ट्विन्सडे, ट्रॅडिशनल डे आणि हॉरर ड्रामा इत्यादी कलाप्रकारात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संचालक खजिनदार सचिन चव्हाण, उपप्राचार्य पी. बालारामडू, सर्व विभागप्रमुख व मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!