‘खोडद जीएमआरटी’मध्ये २८ वे विज्ञान प्रदर्शन

1 min read

खोडद दि.२७:- खोडद (ता. जुन्नर) येथील आशियातील ख्यातनाम रेडिओ दुर्बीण प्रकल्प ‘जीएमआरटी’ (Giant Metrewave Radio Telescope) येथे जागतिक विज्ञान दिनानिमित्त २८ वे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, २८ फेब्रुवारी आणि रविवार, १ मार्च रोजी हे प्रदर्शन विज्ञानप्रेमींसाठी खुले राहणार आहे. गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने भरवले जाणारे हे प्रदर्शन विज्ञानाच्या प्रसारासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरले आहे. यामध्ये अनेक नामवंत संस्था, शाळा व अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी होणार असून, तब्बल २२ संशोधन संस्थांचा सहभाग असणार आहे.शनिवारी सकाळी ९.३० वाजता पुणे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, तर समारोप रविवारी दुपारी ३.३० वाजता पुणे कृषी महाविद्यालयाचे सहअधिष्ठाता डॉ. महानंद माने यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.या प्रदर्शनात ‘जीएमआरटी’च्या कार्यप्रणालीची माहिती, रेडिओ अँस्ट्रॉनॉमीचा इतिहास, तसेच हैदराबाद येथील बलून फॅसिलिटीमार्फत वैज्ञानिक बलूनचे उड्डाण व त्याचे प्रयोग प्रत्यक्ष दाखवले जाणार आहेत. विज्ञानाची गोडी वाढवणारा आणि नव्या पिढीला संशोधनाची प्रेरणा देणारा हा उपक्रम नक्कीच सर्वांसाठी ज्ञानाची मेजवानी ठरेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!