नारायणगड येथे ऐतिहासिक स्थळे संवर्धन जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
1 min read
निमगाव सावा दि.१९:- राष्ट्रीय सेवा योजना विभाग व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने मौजे खोडद गडाचीवाडी नारायणगड या ठिकाणी एक दिवशीय जिल्हास्तरीय ऐतिहासिक स्थळे संवर्धन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व विद्यापीठ गीत गायनाने आणि प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलाने झाली.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या कार्यशाळेच्या उद्देश ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन म्हणजे
प्राचीन वास्तु, गड,किल्ले आणि वारसा स्थळे यांची देखभाल दुरुस्ती आणि जतन करणे होय हे सांगितले.तसेच या कार्यक्रमासाठी बी.डी काळे महाविद्यालय येथील डॉ.माणिक बोऱ्हाडे राष्ट्रीय सेवा योजना विभाग समन्वयक व स्वयंसेवक, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथील स्वयंसेवक,
तसेच दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा येथील एकूण 50स्वयंसेवकांचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अशोक खरात यांनी आपल्या मनोगतातून नारायण गड हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायणगाव जवळ असलेला एक ऐतिहासिक दुर्ग आहे.
नारायण गडाचा किल्ला म्हणून वावर बाळाजी विश्वनाथाच्या कालावधीत सुरू झाला. किल्ल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथांच्या कालावधीत झाली. हे काम नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाले. त्याविषयीची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये आली आहे. दगडात कोरलेल्या मूळ पायऱ्या गडाच्या प्रवेश द्वारा पर्यंत दिसतात.
या तटबंदीत काही बुरुज बघायला मिळतात. तटबंदीवर काटेरी झुडपे उगवली आहेत. गडाच्या उत्तरेस असणाऱ्या तटबंदीत एक चोर दिंडी असून त्यातील माती दगडधोंडे काढण्याचे काम दुर्गसंवर्धन मोहीम अंतर्गत करण्यात आली आहे .या किल्ल्यावर अनेक आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्यांनी सर्व राष्ट्रीय स्वयंसेवकांचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
उपसरपंच शुभांगी काळे यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत जीवन कसे जगावे, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजनातील सर्व स्वयंसेवकांनी नारायण गडावरती जाऊन स्वच्छता व साफसफाई केली. मुकाईमाता व हस्तमाता मंदिर परिसर,
गडाच्या पायऱ्या व त्याभोवती असणारे विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कागद, प्लास्टिक बाटल्या, जुनाट कापडं, कचरा जवळपास ७ ते ८ मोठया बॅग भरून कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावली.तसेच विद्यार्थ्यांनी गडावरती ऐतिहासिक गड संवर्धन करण्यासाठी शपथ घेतली व विवेक कोरडे यांनी शिवगर्जना केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार काळे, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्था प्रतिनिधी कविता पवार, खोडद, गडाचीवाडी येथील सरपंच मनीषा गुळवे, रवी मुळे, रवी वामन, भालचंद्र वामन, महेंद्र भालेराव, विश्वास घंगाळे, संतोष दादा काळे, शुभांगी काळे,
बाळासाहेब गाडगे, मयूर डुकरे,प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे,सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा. नीलम गायकवाड व आभार प्रा. अजय नन्नवरे यांनी केले.
