गुंजाळवाडीत ओला व सुका कचरा वेगळा; कचरा कुंडी चे वाटप

1 min read

बेल्हे दि.१८:- गुंजाळवाडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोग सण २०२४- २५ निधीतून घनकचरा व्यवस्थापन करणे अंतर्गत कचराकुंडीचे वाटप करण्यात आले. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी प्रत्येकी २ कचरा कुंडी मोफत देण्यात येत आहेत. बुधवार दि. १८ पासून कचरा कुंडी वाटप करण्याची सुरुवात करण्यात आली.

या वेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच नयना गुंजाळ, उपसरपंच कविता बोरचटे ,ग्रामपंचायत अधिकारी वर्षा लोंढे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता गुंजाळ, दिपाली बोरचटे, माजी उपसरपंच किसन बोरचटे, संतोष गुंजाळ,गोरख गुंजाळ,माजी उपसरपंच गोविंद गुंजाळ, माजी उपसरपंच राहुल बोरचटे,संगीता बोरचटे, शंकर गुंजाळ, रामदास गुंजाळ, सुभाष बोरचटे, मारुती दिघे,

नामदेव बोरचटे, मुरलीधर वाघचौरे, रत्ना गुंजाळ, कमल वाघचौरे, हनुमान बोरचटे, नाना बोरचटे, सुखदेव गुंजाळ, धोंडीभाऊ गुंजाळ, श्रीराम गुंजाळ, बाबूभाई मुजावर, माणिक मुजावर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!