ब्लॅक बॉक्स जळण्यासाठी ११०० डिग्री तापमान लागतं;तरीही ब्लॅक बॉक्स कसा जळाला? :- आमदार अमोल मिटकरी

1 min read

मुंबई दि.१८:- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर ही दुर्घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडली आणि शेवटच्या क्षणांमध्ये काय घडले होते, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही. या सगळ्याच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला विमानातील ब्लॅक बॉक्स जळून गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ब्लॅक बॉक्सची एकूण रचना पाहता तो जळू कसा शकतो, असा सवाल आता अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन याबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्स हा उच्च तापमानातही वितळत किंवा जळत नाही. मग अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स कसा जळाला, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अपघात झालेल्या त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉस असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?, असा सवाल मिटकरी यांनी ट्विटमध्ये विचारला आहे.अत्यंत आग / उष्णता: अपघातानंतर लागलेली आग जर 1,100°C पेक्षा जास्त तापमानाची असेल किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली, तर आतले घटक — विशेषतः फ्लॅश मेमरी — उष्णतेमुळे खराब होऊ शकतात. अत्यंत जोराचा धक्का: 3,400 Gs पेक्षा जास्त धक्का (जो सामान्य, अगदी प्राणघातक अपघातांपेक्षाही खूप जास्त असतो) बसल्यास यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकते. पर्यावरणीय घटक: खोल समुद्रात दीर्घकाळ मीठ पाण्यात राहिल्यास गंज होऊ शकतो आणि त्यामुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र, ब्लॅक बॉक्स 30 दिवसांपर्यंत उच्च दाब सहन करण्यासाठी डिझाइन केलेला असतो, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण येत आहे. त्यामुळे आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व “लवकरच” विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजते . आम्ही वाट पाहू पण तोवर विमानतळावरील CCTV फुटेज , पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या गाडीत निघाले, कोणत्या रोडवर ट्रॅफिक मध्ये अडकले , त्या ठिकाणचे cctv फुटेज व सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026 चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!