क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा दणदणीत विजय

1 min read

कर्जुले हर्या दि.२:- पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्रिकेट संघाने क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अहिल्यानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अहिल्यानगर यांच्या संघावर शानदार विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच राजीव गांधी कॉलेजच्या खेळाडूंनी शिस्तबद्ध खेळ, प्रभावी फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीचे प्रदर्शन करत सामन्यावर वर्चस्व राखले. संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट संघभावना दाखवत महत्त्वाच्या क्षणी धावसंख्या वाढवली, तर गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर निर्णायक षटके टाकून प्रतिस्पर्धी संघाला मर्यादित धावसंख्येत रोखले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळेही संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला गेला.या पहिल्या फेरीतील विजयाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुलकुमार एस. हिंगोले यांनी क्रिकेट संघाचे अभिनंदन करून पुढील फेऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या व्यवस्थापनाकडून अध्यक्ष मीरा आहेर, सचिव किरण एल. आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे यांनी खेळाडूंच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य व IQAC समन्वयक डॉ. कृपाल पवार यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील फेऱ्यांमध्येही अशीच कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!