सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

1 min read

पुणे दि.३१:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांना शपथ दिली जाणार आहे.बारामती येथील ‘सहयोग सोसायटी’ निवासस्थानावरून सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव जय पवार काल रात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.उद्याचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दुपारी २:०० वाजता मुंबईतील विधानभवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून अधिकृत निवड केली जाईल. यानंतर सायंकाळी पाच वाजता राजभवनावर राज्यपाल सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देतील.सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा या मंत्रालयांची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर अजितदादांकडे असलेले अर्थ आणि नियोजन खाते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. “राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही राहू,” असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी विचारविनिमय करुन उद्या दुपारी आमदारांची बैठक बोलावली आहे. विधानसभेचे आमदार आणि विधानपरिषदेचे आमदार यांची बैठक आज दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती आहे. बारामतीच्या पवार कुटुंबाच्या सून असलेल्या सुनेत्रा पवार यांना माहेरचा देखील राजकीय वारसा आहे. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यापूर्वी सुनेत्रा पवार सामाजिक कामांमध्ये सक्रिय होत्या. 2024 ची बारामती लोकसभा निवडणूक सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. आता त्या अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!