औरंगपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवाची सुरुवात

1 min read

बेल्हे दि.२:- औरंगपूर (ता.जुन्नर) येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार, अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव भक्ती पंढरीत सोहळा २०२६ ची सुरुवात झाली असून ८ दिवस हा उत्साह सुरुवात असणार आहे. दैनंदिन कार्यक्रम मध्ये पहाटे काकडा आरती भजन, त्यानंतर ८ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ वाजता नेमाचे भजन,सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, ७ वाजता हरी किर्तन ९ वाजता महाप्रसाद, रात्री साडेनऊ नंतर श्रीहरी जागर असे दैनंदिन कार्यक्रम असणार आहेत. या काळात अखंड विना पहारा असणार आहे. जेष्ठ कीर्तनकारांचे कीर्तन असणार आहेत. ७ फेब्रुवारी रोजी सप्ताहाचा शेवट असून सकाळी १० ते १२ या वेळेत हभप पांडुरंग महाराज गिरी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी सप्ताहाचे चोख नियोजन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!