स्व.अजित पवार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने आदरांजली अर्पण

1 min read

नारायणगाव दि.३:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका प्रभारी तालुकाध्यक्ष प्रमोद खांडगे आदरांजली अर्पण करताना सांगितले की, काही महिन्यांपूर्वी भाकड जनावरे, दूध दराचा प्रश्न संदर्भात कात्रज दूध संघ पुणे या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर तसेच प्रतिनिधी म्हणून प्रमोद खांडगे उपस्थित होते त्यावेळेला दुधाचे दर कोसळले असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आलेला आहे त्यामुळे दुधाला हमीभाव मिळणे आवश्यक आहे तसेच भाकडकड जनावरांच्या प्रश्न गंभीर असल्यामुळे त्याकडे आपण उपमुख्यमंत्री असल्यामुळे लक्ष घालावे. त्याप्रमाणे दादांनी अतिशय शांतपणे शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर शेतकऱ्यांची बैठक मंत्रिमंडळात लावू. त्यानंतर दुधाला काय अंशाने बाजार भाव वाढले होते.मराठा आरक्षणाबाबत जुन्नर तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा ताफा मराठा सेवकांनी अडवला होता. त्यावेळेला देखील दादांनी मराठ्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान वरील उपोषणानंतर मराठ्यांच्या बाजूने निर्णय देऊ त्यानंतर आरक्षण देखील मराठ्यांना दादांच्या माध्यमातून देण्यात आले होते अशा अनेक आठवणी या वेळेला सांगण्यात आल्या. मनसे शेतकरी सेनेचे अध्यक्ष योगेश योगेश तोडकर यांनी दादांनी वीज बिलाचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांचे व मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे आमच्या आंदोलनाला दादांनी सहकार्य केल्याचे बोलताना सांगितले. शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी देखील यावेळी शोक संदेश अर्पण केला.शोकसभेच्या वेळी शेतकरी संघटना नेते अंबादास हांडे, नारायणगाव उपबाजार समिती उपसचिव शरद धोंगडे, आडतदार शरद शिंदे, उमेश वालझाडे,सचिन बेलवटे, नामदेव थोरात,हर्षद पाटे, विनोद शिंदे, साजिद भाई,संतोष गावडे, शेतकरी अजित ढवळे, सोपान खांडगे, शेतकरी व्यापारी हमाल मापाडी शोक सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!