जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी

1 min read

बेल्हे दि.६:- जुन्नर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसा पासून ढगाळ वातावरण असून रविवार दि.४ रोजी सायंकाळी तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. बेल्हे,आणे, नळवणे, साकोरी, पारगाव तर्फे आळे, निमगाव सावा, बोरी आदी गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरी झाल्या. या बदलत्या वातावरणाचा रबी हंगामावरील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मोहर आलेल्या आंब्यांनाही या वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.यंदा तालुक्यात रबी हंगाम जोमात आलेला आहे. परंतु गेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा, हरभरा, ज्वारी, वटाणा, गहू, मका आदी पिकावर काळा मावा, पांढरा मावा, तुडतुडेचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!