३१ च्या पार्ट्यांवर प्रशासनाची नजर:- मंत्री नरहरी झिरवाळ

1 min read

मुंबई दि.२५:- नववर्षाचे आगमन, उत्सव आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपहारगृहे व खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक आहे.यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.उत्तम स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत. २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हास्तरावरील पुरस्कार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, तर राज्यस्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेल्सचा सन्मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!