बदलापुरात येणार मेट्रो;नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

मुंबई दि.२२:- मुंबई व उपनगरात मेट्रो मार्गिकांचे जाळे उभारण्यात येत आहे. मेट्रोमुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रो 14 संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.मेट्रो नेटवर्कच्या माध्यमातून अंबरनाथ, बदलापूर शहर जोडली जाणार आहेत. त्यातल्या कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गिकेचे काम येत्या 4 महिन्यात सुरू होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी शहरात आले होते.त्यावेळी त्यांनी मेट्रो मार्गिकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, मेट्र 5,12,14 चा फायदा अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना होणार आहे.मुंबई मेट्रो मार्गिका 14 कांजुरमार्ग आणि बदलापूर या दोन शहरांना जोडणार आहे. ही मार्गिका जवळपास 39 किमी लांबीची आहे. पूर्व उपनगरांना या मार्गिकेचा फायदा होणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं मुंबई, ठाणे आणि अंबरनाथ/बदलापूर परिसरातील कनेक्टिव्ही सुधारणार आहे. यामुळं प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसंच, वाहतूक कोंडीदेखील कमी होणार आहेमुंबई मेट्रो 14 मार्गिका कांजूरमार्ग ते बदलापूर हा प्रवास 40-45 मिनिटांत पूर्ण होणार आहे.ही मार्गिका सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 7 लाख प्रवासी प्रवास करू शकतील. मेट्रो 14 मार्गिकेवर 15 स्थानके अपेक्षित आहेत. त्यातील काही स्थानके भूमिगत आहेत तर काही उन्नत असणार आहेत. या प्रकल्पासाठी 14 हजार 898 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.मेट्रोमुळं बदलापूर थेट मुंबईशी जोडले जाणार असून त्याचबरोबर नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशीदेखील जोडला जाणार आहे. बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो 14, वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो 4, स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो 6, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन आणि इतर 3 ठिकाणे इंटरचेंज करून जोडली जातीलमेट्रो बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत पोहोचेल. या मार्गावर एकूण 15 स्थानके असतील त्यातील 13 उन्नत स्थानके असणार आहे.मेट्रोमुळं बदलापूर थेट मुंबईशी जोडले जाणार असून त्याचबरोबर नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशीदेखील जोडला जाणार आहे. बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो 14, वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो 4,स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो 6, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन आणि इतर 3 ठिकाणे इंटरचेंज करून जोडली जातील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!