ओतूर पोलीसांकडुन गुटखा वाहतुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफास

1 min read

ओतूर दि.२२:- ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि लहु थाटे यांना गोपनिय बामतीदारार्माफत माहिती मिळाली की, दिनांक २१ रोजी रात्रीच्या सुमारास मौजे खिरेश्वर गावच्या हद्दीत कटेनर मधील गुटखा पिकअप गाडीमध्ये भरला जाणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने ओतूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच खिरेश्वर गावचे पोलीस पाटील अभिजीत भौरले, खुबी गावचे पोलीस पाटील अविनाश सुपे, ग्रामस्थ निलेश भौरले, दिपक मेमाणे यांनी माहिती मिळाले ठिकाणी जावुन खात्री केली असता दिनांक २१/१२/२०२५ रोजी ०२:०० ते ०२:३० वा.चे दरम्यान कंटेनर नं. एम.एच. ०१ सी.व्ही. ९१२५ यामधील गुटखा पिकअप गाडी नं. एम.एच. १४ जी.यु. ३७८९ यामध्ये टाकत असताना इसम नामे १) सुरज रघुनाथ मेगळे वय-२३ वर्षे २) अतुल अनिल काळे वय-२५ वर्षे ३) माउली विठ्ठल काळे वय १८ वर्षे रा. रोहोकल ता. खेड जि.पुणे हे मिळुन आले तसेच कंटेनर चालक हा अंधाराचा फायदा घेवुन त्या ठिकाणावरून पळुन जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर पोलीसांनी सदरचा कंटेनर व पिकअप गाडी ओतूर पोलीस ठाण्यात आणुन संपुर्ण मुद्देमालाची खात्री केली असता पिकअप गाडी व कंटेनरमध्ये मिळुन आलेला शशी शेखर एंटरप्रायजेस कंपनिचा शुध्द प्लस पान मसाला व शशी शेखर एंटरप्रायजेस कंपनिचा नवी च्युविंग तंबाखु असा एकुण २८,४०,४०० रू किमतीचा गुटखा व २०,००,००० रू किमतीची दोन्ही वाहने कंटेनर व पिकअप असा एकुण ४८,४०,४०० रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळुन आलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून पो.कॉ. ज्योतीराम पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने ओतूर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३६७/२०२५ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनीयम २००६ चे कलम २६ (२) (ⅰ), २६(२) (iv), २७(३) (९), ५९ सह भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १२३,२२३,२७४,२७५,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन वर नमुद तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लहु थाटे हे करत आहेत.सदरची कारवाई संदिपसिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि लहु थाटे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पो.हवा देविदास खेडकर, पो.हवा. बाळशिराम भवारी, पो. हवा. धनंजय पालवे, पो.कॉ. ज्योतीराम पवार, पो.कॉ. मनोजकुमार राठोड, पो.कॉ. संतोष भोसले, पो.कॉ. रोहीत बोंबले तसेच खिरेश्वर गावचे पोलीस पाटील अभिजीत भौरले, खुबी गावचे पोलीस पाटील अविनाश सुपे, ग्रामस्थ निलेश भौरले, दिपक मेमाणे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!