पादीरवाडीत उच्चशिक्षित महिलेला गुलाबाच्या शेतीतून चांगला नफा
1 min read
आळेफाटा दि.१२:- सध्या प्लास्टिकच्या फुलांना मागणी असली तरी कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा पुजेसाठी आपण नेहमी गुलाबाच्या फुलांचा वापर करत असतो.लग्न कार्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी गुलाबाच्या फुलांचा आपण नेहमी वापर करत असतो. गुलाब हे व्यापारी पिकातील फुल म्हणून ओळखले जाते.
गुलाबाच्या शेतीतून मोठं आर्थिक गणित शेतकऱ्यांना मांडता येतं. पण त्यासाठी योग्य नियोजनाची गरज लागते व असेच अश्या प्रकारे पादीरवाडी (ता.जुन्नर) येथील सविता सत्यवान गागरे यांचे शिक्षण डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पर्यंत असताना केवळ शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरीच्या मागे न लागता
गुलाबाचे पिक घेतले असुन व हे पिक जवळपास ७ ते ९ वर्षे चालत असल्याने या मधुन त्यांना चांगला प्रकारे रोजगार मिळाला असुन पैसा देखील चांगला मिळत आहे.गागरे यांना शेती करत असताना ती तोट्यातच जात होती. कोणते पिक घेतल्याने आपल्याला चांगले पैसे मिळतील यावर अभ्यास करून त्यांनी गुलाबाच्या फुलांची लागवड करण्याचे ठरविले.
यासाठी सुरवातीला परीसरात असलेल्या ज्या ज्या ठिकाणी गुलाबांच्या बागा आहेत. त्या ठिकाणी शेतावर जाऊन माहिती घेऊन लागवड करण्याचे ठरविले. यासाठी ३३ गुंठे क्षेत्राची निवड करत या शेतात ५ ट्राॅली शेणखत पांगवुन ते तापत ठेवले व एक महिन्यानंतर सहा फुटाचे अंतर ठेवुन बेड पाडले व यामध्ये अडीच फुटांचे अंतर ठेवुन
शिर्डी गुलाब या जातीच्या फुलांची सुमारे २५०० रोपे आणुन लावली.या संपुर्ण बागेला ठिबक सिंचन ची व्यवस्था केल्याने वेळोवेळी औषधे व मर्यादीत पाणी दिल्याने माळरानावर गुलाबाची बाग चांगली फुलली आहे. त्यांना यासाठी एक ते दिड लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे.सध्या या रोपांना चांगली फुले आली असुन
दिवसाआड फुले तोडुन आता पर्यंत दोन ते अडीच हजार किलो फुले निघुन ती विकली आहेत . झालेला खर्च जाऊन त्यांना पंचेचाळीस ते पन्नास हजार रूपयांचा नफा झालेला आहे.यापुढे पुढील सात ते नऊ वर्षे पुर्ण पिक नफ्यात असुन माल पण जास्त निघणार आहे.
सध्या शिर्डी गुलाब या जातीच्या फुलांना किलोला २०० रुपये किलोप्रमाणे बाजारभाव चालु असुन ज्या दिवशी सन, लग्ण , यात्रा आहेत त्या दिवशी २५० रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळत आहे.
बाजारभाव
सन २०२१- ७० ते १५० रुपये किलो
सन २०२२- ४० ते १८० रुपये किलो
सन २०२३ – ४० ते १९० रुपये किलो
सन २०२४- ४० ते २०० रुपये किलो
सन २०२५ – ४५ ते २५० रूपये किलो
