श्री रंगदास स्वामी महाराज यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

1 min read

आणे दि.१२:- श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळ्यानिमित्त आणे (ता.जुन्नर) येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.१८ डिसेंबर ते शुक्रवार दि.१९ डिसेंबर या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये या स्पर्धा होणार आहेत.

यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ७५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ६५ हजार रुपये व तृतीय क्रमांकाचे बक्षीस ५५ हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप असेल. तसेच प्रथम फळी फोड गाडा ११ हजार रुपये, द्वितीय फळी फोड गाडा ७ हजार रुपये,

तृतीय फळी फोड गाडा ५ हजार रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले असून आकर्षक फायनल प्रथम बक्षीस, आकर्षक फायनल दुसरे बक्षीस आदी बक्षिसे देण्यात येणार आहेत. अशी माहिती सचिव शैलेश शिवाजी आहेर यांनी दिली.

तर मंगळवार दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता आणे येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिराजवळ लकी ड्रॉ पद्धतीने टोकन दिले जातील. तसेच शुक्रवार दिनांक १९ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा रक्तदान शिबिराचे सातवे वर्ष असून दरवर्षी शेकडो रक्तदाते रक्तदान करतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!