आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याच्या समस्येकडे वेधले सरकारचे लक्ष
1 min read
नागपूर दि.११:- ‘बिबट्याच्या गंभीर समस्येवर मी २०१४ पासून बोलत होतो. बिबट्या सफारीचा विषय सातत्याने मांडत होतो.तेव्हा माझी टिंगल, मस्करी झाली.अधिवेशनात मला ‘बिबट्या आला’ म्हणून हिणवले गेले,’ असा आरोप करून जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्या समस्येवर सरकारला खडे बोल सुनावले.
सोनवणे यांनी बिबट्याचा पेहराव करून अधिवेशनासाठी सभागृहात प्रवेश केला. दरम्यान, प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी बिबट्यांसाठी जंगलात शेळ्या सोडण्याच्या वनमंत्र्यांच्या घोषणेसह अनेक विषयांवर कोरडे ओढले. सोनवणे म्हणाले, ‘बिबट्याच्या हल्ल्याने नागरिक त्रस्त आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या व्यक्तीच्या जीवाची किंमत २५ लाख होत नाही. २५ लाख दिलेला माणूस कोणी विधवा झालेल्या पत्नीचा पती, कोणाचे एकुलते एक बाळ आहे,कोणाचा भाऊ,कोणाची बहीण आहे हे विसरून चालणार नाही. बिबट्यांच्या समस्येवर उपाययोजना म्हणजे तीन महिन्यांच्या आत दोन हजार
बिबट्याच्या समस्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अधिवेशनात थेट बिबट्याचा पेहराव करून प्रवेश केला.बिबटे ठेवता येतील असे बचाव केंद्र जुन्नर आणि अहिल्यानगरला उभारा. एकात एक हजार माद्या आणि दुसऱ्यात नरांना ठेवा, म्हणजे नसबंदीचाही प्रश्न मिटेल.’
‘सरकार म्हणतंय… तारेचा पट्टा गळ्यात बांधा, विजेचा शॉक बिबट्याला बसेल असे कुंपण करून आत राहा, हे उपाय नाहीत.तर बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी ‘ब्लू स्टार ऑपरेशन’ करा, मायक्रो ऑपरेशन करा. त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये बंद करून, त्यांना बसून खायला घाला.
बिबट्यांसाठी शेळ्या सोडण्याचा निर्णय घेऊन चालणार नाही, शेळ्यांच्याच चोऱ्या होतील. शेळ्या लोकच घेऊन जातील. मुळात बिबटे जंगलात राहतच नाहीत. ते राहतात उसात आणि आमच्या घराजवळ. असे असताना तज्ज्ञ मंत्र्यांना सल्ले देतात, की बिबट्यांसाठी शेळ्या सोडा. ‘एसी’ त राहून सूचना आणि सल्ले देणे सोपे आहे; पण वास्तवाचे भान ठेवून उपाययोजना करणे हे महत्त्वाचे आहे.’
