वडगाव कांदळीत भव्य बैलगाडा शर्यत:- मा.सरपंच रामदास पवार
1 min read
बेल्हे दि.११:- वडगाव कांदळीत बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील शंभू महादेव यात्रेनिमित्त भव्य अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. १३ डिसेंबर व १४ डिसेंबर या कालावधीत हा यात्रा उत्सव पार पडणार असल्याची माहिती वडगाव कांदळीचे माजी सरपंच रामदास पवार यांनी दिली.
सकाळी ८ वाजल्यापासून भव्य अशा बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून प्रथम क्रमांकाच्या गाड्यास १ लाख ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकाच्या गाड्यास १ लाख१ हजार १११ रुपये आहे.
दोन दिवसांत सर्वात आतून येणाऱ्या गाड्यास शंभू महादेव केसरी घाटाचा महाराज बुलेट १ लाख ५० हजार रुपयांची मिळणार आहे. तसेच फळी फोड गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. वडगाव कांदळीच्या घाटामध्ये जुन्नर तालुक्यासह आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ ,पारनेर, संगमनेर, अकोले
या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बैलगाडे येत असतात .जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असा हा बैलगाडा घाट असून मोठ्या प्रमाणात लोक शर्यती पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. कोरोनानंतर तसेच शर्यती बंदीनंतर प्रथमच वडगाव कांदळी येथे बैलगाड्यांची शर्यत पहावयास मिळणार असल्याने परिसरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
