शिरसगांव येथे आज रघूनाथ पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

1 min read

नेवासे दि.७:- राज्यातील शेतकरी,शेतमजुर,बारा बलुतेदार यांची मायक्रो फायनान्स,सहकारी पतसंस्था व खासगी सावकारांच्या कर्जातून मुक्तता करा आणि दुधासह सर्व शेती मालास उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव देवून दोन साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करा. तसेच साखर आयुक्तालयाचे नांव ऊस आयुक्तालय करा या व अन्य मागण्यांसाठी शिरसगांव (ता.नेवासे) येथील जगदंबा लॉन्स येथे रविवार (दि.७) रोजी सकाळी ९ वाजता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघूनाथदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहीती शेतकरी संघटनेचे नेते जेष्ठ विधिज्ञ अॅड.अजित काळे यांनी दिली.या शेतकरी मेळाव्यात खरीप पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावा,अतिवृष्टी अनुदानापासुन वंचित शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वर्ग करण्यात यावे,
शेतकऱ्यांच्या ऊसाला सात हजार पाचशे रुपये दर प्रत्येक कारखन्याने जाहिर करावा तसेच हा हमीभाव केंद्र सरकारने कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात तसेच शेतकऱ्यांना तात्काळ सरसगट कर्ज मुक्ती देण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या शेती मालाला स्वामीनाथन आयोग लागू करुन हा हमी भाव देण्यात यावा तसेच दि.२६ नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार १ वर्षाकरीता कर्ज वसुली थांबवेली आहे त्यामुळे कोणत्याही साखर कारखान्याने शेतकऱ्यांची कपात करु नये तसेच कुकडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकित पेमेंट व्याजासहीत शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात येवून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास विज पुरवठा देण्यात करण्यात यावा व चालु गळीत हंगामात प्रत्येक कारखान्याने १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पेमेंट वर्ग करावे तसेच वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करण्यात यावा, आवश्यक वस्तु कायदा, भूसंपदनाचे कायदे,सिलिंगचे कायदे यासह सर्व शेतकरी विरोधी कायदे रद्द करा व गाईच्या १ लीटर दुधाला १ लिटर डिझेल एवढा तर म्हशीच्या १ लिटर दुधाला १ लीटर पेट्रोल एवढा भाव मिळण्याच्या मागणीसाठी सरकारचे या शेतकरी मेळाव्यातून लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहीती शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व जेष्ठ विधिज्ञ अजित काळे यांनी यावेळी बोलतांना दिली या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड.बाळासाहेब कावळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!