एअरपोर्ट की रेल्वे स्टेशन;इंडिगोच्या विमानांची सेवा आजही डळमळीतच

1 min read

पुणे दि.७:- इंडिगोच्या प्रवाशांच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही कमी झालेलं नसून त्यांच्या अडचणीही कमी होताना दिसत नाहीयेत. गेल्या चार दिवसापासून सतत विमान उड्डाणं रद्द होत आहेत. इंडिगोच्या विमानांची सेवा आजही डळमीच असून आत्तापर्यंत हजारो उड्डाणं रद्द झाल्याने प्रवाशांना मात्र चांगलाच फटका बसला आहे.पुण्यातही इंडिगोची आज दिवसभरातील 42 विमान उड्डाण रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात येणारी 14 आणि पुण्याहून विविध शहरात जाणाी 28 विमान रद्द झाल्याची माहिती एयरपोर्ट अथॉरिटीकडून देण्यात आली आहे. ऑपरेशनल अडचणी हळूहळू सुधारत आहेत, परंतु 10 ते 15 डिसेंबर दरम्यानच सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षा असल्याचे सांगत कंपनीचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी माफी मागितली आहे. देशभरात आज इंडिगोची 452 उड्डाणं रद्द झाली आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!