सकाळ स्कूल ऑलिम्पिक्स 2025 : रुद्र काकडेची सुवर्ण झेप!
1 min read
वडगाव कांदळी दि.२:-विमान नगर स्केटिंग रिंग, पुणे येथे पार पडलेल्या सकाळ स्कूल ऑलिम्पिक 2025 – 1000 मीटर स्केटिंग स्पर्धेत व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडीचा इयत्ता पहिलीतील गुणी विद्यार्थी रुद्र रोहित काकडे याने उत्कृष्ट कामगिरीची नोंद करून सर्वांचे मन जिंकले.
केवळ पहिलीत शिकत असलेल्या या छोट्या स्केटरने 10 वर्षाखालील वयोगटात अप्रतिम गती, संतुलन आणि कौशल्याचा सुरेख मिलाफ सादर करत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले.स्पर्धेतील त्याची दमदार उपस्थिती, सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाखवलेला आत्मविश्वास आणि वेग नियंत्रित करण्याचे कौशल्य पाहून प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी स्वागत केले.
रुद्रची ही अभिमानास्पद कामगिरी त्याच्या सातत्यपूर्ण मेहनत,प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रोत्साहनाचे फलित ठरली. अशा लहान वयात इतकी मोठी उपलब्धी मिळवत रुद्रने शाळेचा मान उंचावला आहे.व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे
यांनी रुद्र चे कौतुक केले व प्रशिक्षक महेंद्र गुळवे यांचेही अभिनंदन केले. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांनी रुद्रचे अभिनंदन केले तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
