पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ:- श्रीकांत मदने
1 min read
आळेफाटा दि.३:- पोलीस भरतीसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली असून उमेदवारांना ७ डिसेंबर २०२५ पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. या आधी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. अर्ज भरताना अडचण येणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली सुवर्णसंधी लाभली आहे.
तर आवेदन ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. राहिलेल्या उमेदवारांनी काळजीपूर्वक व विचारपूर्वक अर्ज भरण्याचे आवाहन सूर्या करिअर अकॅडमी चे संचालक श्रीकांत मदने यांनी केले आहे.
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, कारागृह पोलीस, सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. कदाचित ही शेवटची मुदत वाढ असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन मदने यांनी केले आहे. उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज भरावा.
तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना काळजीपूर्वक व जागांचा विचार करुन ऑनलाईन अर्ज भरावा. उमेदवारांनी शारीरिक व लेखी परीक्षेची चांगली तयारी करावी. आळेफाटा येथील सुर्या करिअर अकॅडमी मध्ये उमेदवारांची सर्व तयारी करून घेतली जाते. सुर्या अकॅडमीच्या विद्यार्थांचे शासकीय सेवेत भरती होण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे.
स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांनी अचूक मार्गदर्शनासाठी अकॅडमी मध्येच सराव करावा असे आवाहन श्रीकांत मदने यांनी केले आहे. पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी शासनाच्या या अधिकृत policerecruitment2025.mahait.org व www.mahapolice.gov. in आणि www. maharashtrasrpf.gov.in संकेतस्थळांला उमेदवारांनी भेट द्यावी.
