अर्धा एकर क्षेत्रातुन काकडीचे लाखोंचे भरघोस उत्पन्न
1 min read
मंचर दि.३ -आंबेगाव तालुक्यातील एका छोट्याश्या जारकरवाडी गावातील सचिन भोजने या शेतकऱ्याने अर्धा एकरात क्षेत्रात नेत्रा कंपनीच्या समृद्धी नावाच्या काकडी वाणाची लागवड केल्याने भरघोस असे उत्पन्न मिळाले आहे. तालुकाभर चालू असलेल्या परतीचा पावसामुळे अनेक ठिकाणी शेतमालांचे नुकसान झाले.
यामुळे शेतकरी भयभीत झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणते पीक घ्यावे, कोणते नाही याकरता शेतकरी चिंतीत असायचा.आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीतील शेतकरी सचिन भोजने यांनी वीस गुंठे क्षेत्रात नेत्रा समृद्धी काकडीची लागवड केली.
सुमारे ३० ते ४० दिवसापासून त्यांच्या काकडीची बाजारात विक्री सुरू असून या कालावधीत त्यांना उत्तम असा मोबदला मिळालेला आहे. तसेच त्यांच्या शेतीसाठी बियाणे खरेदी पासून ते विक्री पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन नेत्रा सीड्स कंपनीचे प्रतिनिधी बढे यांनी केले तसेच मंचर येथील महेश कृषी सेवा केंद्र च्या पुजा भोर यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.
